Ad will apear here
Next
जावे पुस्तकांच्या गावा...
'पुस्तकांचं गाव' म्हणून नावारूपाला येत असलेलं भिलार गाव

भाषेचे संवर्धन ही खरे तर आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या उपायययोजना राबवल्या जात आहेत, ही आनंदाचीच बाब आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने महाबळेश्वरजवळच्या भिलार गावात ‘पुस्तकांचं गाव’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची ओळख....
................

सातारा जिल्ह्यात पाचगणीजवळ असलेल्या ‘भिलार’ या गावाची ओळख आजवर स्ट्रॉबेरीचे गाव अशी होती. आता ‘पुस्तकांचे गाव’ अशी नवी ओळखही या गावाला मिळणार आहे. या दृष्टीने तेथील तयारी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. गावाची रचना वेगळ्या पद्धतीने करण्यात येत आहे. येथे प्रत्येक घरी पुस्तकांचा ठेवा असेल, तसेच वाचण्यासाठी विशिष्ट प्रकारची आसनव्यस्था असेल. या ठिकाणी येणारे पर्यटकही वाचण्यासाठीच येतील. विविध प्रकारचे साहित्यिक उपक्रम या ठिकाणी चालणार आहेत.
 
पुस्तकाचे गाव तयार करण्यासाठी येथे घरे निवडण्यात आली आहेत. सर्व प्रकारची पुस्तके एकाच ठिकाणी वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सर्व साहित्यिक, लेखकांनी दिवाळी अथवा इतर सुट्टीच्या कालावधीत या गावात जाऊन तेथील वाचकांशी संवाद साधल्यास वाचक आणि लेखकांचे नाते अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे. आगामी काळात सर्व शाळांनी वर्षातून एकदा तरी पुस्तकांच्या या गावात विद्यार्थ्यांची सहल न्यावी आणि विद्यार्थ्यांना या अनोख्या गावाची माहिती द्यावी, असेच हे गाव तयार होत आहे.
निवडलेल्या मराठी साहित्य प्रकारानुसार प्रत्येक घरात ८०० ते एक हजार पुस्तके ठेवण्यात येत आहेत. उदा. पर्यटकांना मराठी भाषेतील प्रवासवर्णन किंवा काव्य या प्रकारचे साहित्य वाचायचे असल्यास एकाच घरात निवडक ८०० ते एक हजार पुस्तके उपलब्ध असतील. ती पुस्तके त्यांनी तिथेच वाचायची. त्यासाठीची जागा, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्थाही त्याच घरात केलेली असेल. पर्यटकांना ही पुस्तके मोफत वाचता येतील. परंतु निवास व भोजनाचा खर्च त्यांना करावा लागेल. असे हे अनोखे पुस्तकांचे गाव येत्या एक मे रोजी आपल्यासाठी सज्ज होत आहे. एकदा तरी आवर्जून या गावाला भेट द्यायलाच हवी.

काही उल्लेखनीय बाबी 

- भिलार हे निसर्गसंपन्न गाव असून, ते स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे.
- गावात, मराठीतील विविध साहित्यप्रकारानुसार दिशादर्शक फलक लावले जातील.
- मराठी भाषेतील विविध साहित्य छटांनुसार गावातील जवळजवळ तीस घरांची निवड. तिथे निवास आणि भोजन व्यवस्थाही उपलब्ध असेल.
- प्रत्येक साहित्यप्रकारासाठी एक घर.
- पर्यटन तर होईलच. शिवाय स्ट्रॉबेरीसोबतच वाचनाचा आनंदही लुटता येणार आहे.
- पुस्तकांच्या गावामधील तीस घरांना पुस्तकांच्या अनुषंगाने त्या घरांच्या आवश्यकतेनुसार सुशोभीकरण करण्यात आले आहे.
- देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZBVBB
Similar Posts
साकारले पहिले ‘पुस्तकांचे गाव’ मुंबई : भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन येत्या चार मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले भिलार हे गाव ‘पुस्तकांचे गाव’ या अभिनव स्वरूपात पुढे येत आहे. पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावर पाचगणीपासून सुमारे ५ किलोमीटर
पुस्तकांच्या गावाने रचला इतिहास सातारा : ‘वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी व समृद्ध करण्यासाठी साहित्यिक व प्रकाशकांनी भिलारमध्ये येऊन कार्यक्रम घडवून आणावेत,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘यापुढे सहलीसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून या गावाकडे निश्चितपणे पाहिले जाईल. आजवर स्ट्रॉबेरीच्या नावाने ओळखले जाणारे थंड हवेच्या ठिकाणी
जत्रेमुळे ‘पुस्तकांचं गाव’ प्रकल्प तात्पुरता बंद मुंबई : ‘पुस्तकांचं गाव, भिलार येथे गावची जत्रा असल्याने, १३ ते १५ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत ‘पुस्तकांचं गाव’ हा प्रकल्प तात्पुरता बंद राहणार आहे,’ अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील निवडक संग्रहालये पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतिहास-संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, या इतिहासातील नोंदी सुसंगत पद्धतीने मांडण्याची आवश्यकता असते. त्यामुळे संग्रहालयांची भूमिका महत्त्वाची असते. इतिहासातील समाजकारण-राजकारण-संस्कृती समजून घेण्यासाठी संग्राहालयातील शिलालेख, भित्तीलेख, मूर्ती, ताम्रपट, भूर्जपत्रे,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language